नवी दिल्ली : चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आज भारत दौऱ्यावर आहेत, मात्र वास्तविक नियंत्रण रेषेवर अजूनही भारत आणि चीनमध्ये वातावरण तापलेलंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये चीनी आणि भारतीय लष्कर अजूनही आमने सामने आहेत.
दरम्यान केंद्र सरकारने चीनी सैनिकांनी एलएसी ओलांडू न देण्याच्या सूचना भारतीय लष्कराला दिल्या आहेत.
एक रिपोर्टनुसार डेमचोकमध्ये चीनी सैनिक आणि गुराखींनी घुसखोरी केल्यानंतर अजूनही ते भारतीय सीमेत आहेत. तसेच चुमुरमध्ये शंभर भारतीय सैनिकांना केलेला घेराव अजूनही कायम आहे. यानंतर दोन वेळेस फ्लॅग मिटींग झाली आहे, या मिटींगमध्ये कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही.
दरम्यान आणखी कुमूक आल्यानंतर चीनी सैनिकांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. हे प्रकरण ही चुशूलमध्ये झालेल्या फ्लॅग मिटिंगमध्ये उचलण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.