'विप्रो'तील ४७,००० कर्मचाऱ्यांची जावू शकते नोकरी

भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी 'विप्रो' पुढील तीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्याच्या संख्या कमी करण्याच्या विचारात आहे. जवळपास ४७,००० कर्मचाऱ्यांना विप्रो कमी करू शकते. 

Updated: Apr 29, 2015, 01:28 PM IST
'विप्रो'तील ४७,००० कर्मचाऱ्यांची जावू शकते नोकरी title=

नवी दिल्ली: भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी 'विप्रो' पुढील तीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्याच्या संख्या कमी करण्याच्या विचारात आहे. जवळपास ४७,००० कर्मचाऱ्यांना विप्रो कमी करू शकते. 

विप्रोचे सीईओ टी. के. कुरिअन यांनी फ्रॅंकफर्टमध्ये बोलतांना सांगितले की, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार कंपनी ऑटोमोशन, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस आणि डिजिटल सर्विसेसवर भर देण्याच्या कारणाने पुढील तीन वर्षात ३० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाईल. 

सूत्रांना सांगितले की, सीईओनीं स्पष्ट केलं आहे की मुख्य जोर कर्मचाऱ्यांना काढण्यावर नसून व्यापक क्षमता प्राप्त करण्यावर आहे. बंगळुरूमध्ये असलेल्या या कंपनीत ३१ मार्च २०१५ पर्यंत १,५८,२१७ कर्मचारी कार्यरत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.