पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवारही!

काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद पवार यांचं नावही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 31, 2013, 10:30 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद पवार यांचं नावही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केलं आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात वरिष्ठ नेते असून, ते पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी केला आहे.

सध्या युपीएसोबत राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी येत्या काळातील राजकीय परिस्थितीवर सर्व अवलंबून असेल, असंही त्यांनी म्हटलय.