रीवा : मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीला धडा शिकवण्यासाठी चक्क त्याच्या दोन्ही डोळ्यात फेविक्विक टाकल्याची धक्कादायक घटना घडलीये.
संतोष वर्मा असं त्या पतीचं नाव आहे. त्याचे त्याची पत्नी विजय लक्ष्मी हिच्याशी रोज भांडण होत असे. बुधवारी रात्रीही या जोडप्याचे पुन्हा भांडण झाले. यावेळी पत्नीला राग अनावर न झाल्याने तिने पतीला धडा शिकवण्यासाठी तो गाढ झोपेत असताना त्याच्या डोळ्यात फेविक्विक घातले.
गुरुवारी सकाळी संतोषला नेहमीप्रमाणे जाग आली मात्र त्याचे डोळे उघडत नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोळे न उघडल्याने संतोषने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. मात्र यादरम्यान त्याची पत्नी घराच्या मागच्या दरवाजातून पळून गेली.
पोलिसांनी पिडीत संतोषला रुग्णालयात भर्ती केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप पत्नी विजयलक्ष्मीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.