ऋषीनं टॉयलेटमध्ये विचारली जात - शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सुपरस्टार अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर जातीयवादाचा आरोप केलाय. शशी थरूर यांनी ऋषी कपूर यांच्यावर आपल्याशी जातीयवादी भेदभाव करण्याचा आरोप केलाय. 

Updated: Jan 13, 2015, 02:57 PM IST
ऋषीनं टॉयलेटमध्ये विचारली जात - शशी थरूर title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सुपरस्टार अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर जातीयवादाचा आरोप केलाय. शशी थरूर यांनी ऋषी कपूर यांच्यावर आपल्याशी जातीयवादी भेदभाव करण्याचा आरोप केलाय. 

हफिंगन पोस्टमध्ये एका लेखात भारतात जातीय विचारांवर आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना शशी थरूर यांनी हा आरोप केलाय.

थरुर जेव्हा १० वर्षांचे होते तेव्हा सहाव्या वर्गात असताना शाळेत विविध वर्गातील विद्यार्थ्यांचं एक नाटकात आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत होते. यावेळी, ऋषी कपूर आठव्या वर्गात होते.

या कार्यक्रमात शशी थरूर यांचं मोठं कौतुक करण्यात आलं होतं... त्यामुळे ऋषी कपूर नाराज झाले होते. दुसऱ्या दिवशी टॉयलेटमध्ये असताना ऋषीनं शशीला 'तुझी जात कोणती?' असा प्रश्न विचारला. शशीला तेव्हा याचं उत्तर माहीत नव्हंत... त्यामुळे ऋषीनं लागलीच त्याला 'म्हणजेच तुला तुझी जातही माहित नाही? प्रत्येक व्यक्तीला त्याची जात माहीत असते...' असं म्हणत शशीला हिणवलं. '...म्हणजेच तू ब्राह्मण आहेस की आणखी कुणी?' असाही प्रश्न ऋषीनं आपल्याला विचारला, असं शशी थरूर यांनी म्हटलंय. 

यानंतर मात्र ऋषीचं कधीच शशीशी बोलणं झालं नाही... पण, यादिवशी शशी घरी पोहचले तेव्हा आपल्या वडिलांकडे त्यांनी याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी आपण नायर असल्याचं शशीला सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.