मुंबई : विद्यार्थी जीवनात तुम्ही देखील कधी असं केलं नसेल ते या विद्यार्थ्याने केलं आहे. केरळमधील एका इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याने असं काही केलं आहे की शिक्षक देखील ही गोष्ट विसरू शकणार नाही. श्रीनाथ हा विद्यार्थी एका गोष्टीसाठी आपल्या मित्रांसोबत थेट शिक्षकांच्याय लग्नात पोहोचला. तो लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी नाही तर त्याच्या प्रोजेक्टवर शिक्षकाची सही घेण्यासाठी आला होता.
प्रोफेसर हे लग्न असल्यामुळे सुट्टीवर होते. पण या विद्यार्थ्याने शिक्षण पुन्हा येण्याची वाट पाहिली नाही आणि लग्नात त्यांना जणू हे वेगळंच गिफ्ट दिलं.
श्रीनाथ ही अनोखी आयडिया काम करुन गेली आणि शिक्षकाला त्या प्रोजेक्टवर भर स्टेजवर सही करावी लागली. यावेळेस शिक्षकाच्या होणाऱ्या पत्नीला ही हसू आवरलं नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ