लखनऊ : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील मुजफ्फनगर येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र मुजफ्फरनगर कोर्टात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांच्यावर भड़काऊ भाषण देण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
शाहांच्या विरोधात मुजफ्फरनगरच्या नई मंडी कोतवालीमध्ये प्रकरण दाखल करण्यात आले होते. यूपी पोलिसांनुसारस अमित शाह यांनी मुजफ्फरनगर येथील द्वारिकापुरीमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भड़काऊ भाषण केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोप पत्र भारतीय दंड संहितेच्या अशा गंभीर कलमानुसार दाखल करण्यात आला आहे की त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. जर अमित शाह यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले, तर त्यांना ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. लोकसभा निवडणूक प्रचार करताना शाह यांच्या विरोधात द्वारिका पुरी येथील एका ठिकाणी आयोजित सभेनंतर हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. अमित शाह त्यावेळी उत्तर प्रदेशचे भाजप प्रभारी होते.
मुजफ्फरनगरसह शामली आणि बिजनौर येथेही त्यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली होती. मुजफ्फरनगर येथील नई मंडी ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका हॉलमध्ये ४ एप्रिल २०१४ मध्ये एका सभेत अमित शाह यांनी भाषण दिले होते. अमित शाह यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला. या संदर्भातील व्हिडिओ क्लिप आधार मानून १२ एप्रिल नई मंडी ठाण्यात अमित शाह यांच्या विरोधात प्रकरण दाखल करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.