सोन्याचे दर घसरले... जाणून घ्या ग्राहकांनी काय करावं?

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सोन्याला मागणी कमी झाल्यामुळं मागच्या दोन वर्षातील ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

Updated: Jul 23, 2015, 04:31 PM IST
सोन्याचे दर घसरले... जाणून घ्या ग्राहकांनी काय करावं? title=

नवी दिल्ली: सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सोन्याला मागणी कमी झाल्यामुळं मागच्या दोन वर्षातील ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

या घसरलेल्या दरात ग्राहकांनी या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात

१. गोल्डमॅन साक्स ग्रुपनं पिवळ्या धातूंच्या किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणूनचं किमतीत पुन्हा वाढ होण्याआधी सोन्यामध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही.

२. सध्या गुंतवणूकदार या किमती धातूपासून दूर जात आहेत आणि डॉलरमध्ये अधिक गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. तरीही तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली असेल तर घाबरायचं काही कारण नाही. 
जोपर्यंत कुठलीही गरज नसेल तोपर्यंत सोनं विकायची घाई करू नये. योग्य वेळ येईपर्यंत थांबा.

३. नेहमी होणाऱ्या परिवर्तनामुळं तसंच अनिश्चिततेमुळं शेअर बाजाराचा काळ थोड्या वेळासाठी कठीण आहे आणि किमतीमध्ये होणाऱ्या सुधारणेसोबतच चांगल्या पर्यायाची वाट पाहण्याची गरज आहे.  

४. यावेळी तुम्ही तुमच्या पूर्ण बजेटमधील ३० ते ४० टक्क्यांची सोन्यात गुंतवणूक करू शकता. सोन्याच्या किमती वाढल्यावर तुम्ही हे सोनं विकून नफा करू शकता. येत्या काही काळात सोनं ३० हजारांचा पल्ला गाठेल अशी शक्यता दिसत नाही. तरी किमतीत थोडी सुधारणा झाल्यावर तुम्ही रिस्क घेऊ शकता.

५. सोन्याच्या किंमतीतील सुधारणा चालू खात्यातील तूटीवरचा भार कमी करतील, जे सरकारसाठी खूप फायद्याचं ठरेल. चालू खात्यावरील तूटीचा सरकारला पुढं जाऊन कल्याणकारी योजनांसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेवलेपमेंट तसंच सामान्य लोकांचा फायदा करून देण्यात मदत होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.