राज ठाकरेंविरोधात वॉरंट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 1, 2013, 09:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुझफ्फरनगर
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...
राज ठाकरे यांना १२ नोव्हेंबरपूर्वी मुजफ्फर-पूर्व कोर्टात हजर करा, असा आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. बॉडी वॉरंट म्हणजे जर राज ठाकरे कोर्टात हजर राहिले नाहीत, तर तो कोर्टाचा अपमान समजून त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु होईल.
१६ नोव्हेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर यातील काही आरोपी बिहारमधून पकडण्यात आले होते. याबद्दल आपल्या भाषणात बोलताना सर्व गुन्हेगार बिहारचेच असतात असं राज ठाकरे म्हणाले होते. तसंच बिहारींचा उल्लेख बलात्कारी असाही केला होता.
यापूर्वीही राज ठाकरे यांच्याविरोधात मुजफ्फरपूर कोर्टानेच वॉरंट जारी केलेलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.