प्रवासांच्या सेवेसाठी रेल्वेकडून 'वेक अप कॉल'

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर स्टेशन निघून जाईल, अशा तणावात आता राहू नका, कारण तुमचं स्टेशन येण्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला रेल्वेकडून कळवलं जाणार आहे. 

Updated: Apr 9, 2015, 11:00 PM IST
प्रवासांच्या सेवेसाठी रेल्वेकडून 'वेक अप कॉल' title=

नवी दिल्ली : तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर स्टेशन निघून जाईल, अशा तणावात आता राहू नका, कारण तुमचं स्टेशन येण्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला रेल्वेकडून कळवलं जाणार आहे. 

प्रवाशांची  गैरसोय लक्षात घेता रेल्वेकडून 'वेक-अप अलार्म कॉल' आणि 'डेस्टिनेशन अलार्म कॉल' या सुविधा कमी दरात सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या प्रवाशांना ही सुविधा हवी आहे त्यांना रेल्वेकडे तशी मागणी करावी लागेल, अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते नीरज शर्मा यांनी दिली. 

'डेस्टिनेशन अलर्ट' या सेवेअंतर्गत प्रवाशांना त्यांची गाडी स्थानकावर येण्याच्या नेमक्या वेळेच्या अर्धा तास अगोदर फोन करून कळवले जाईल. तर, 'वेक-अप अलार्म' या सुविधेतंर्गत इच्छित स्थानक येण्याच्या अर्धा तास आधी रेल्वेकडून कळविले जाईल. 

रेल्वेच्या १३९ या चौकशी क्रमांकावर फोन करून किंवा लघुसंदेश पाठवून प्रवासी  'डेस्टिनेशन अलार्म कॉल' सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तर 'वेक-अप कॉल'च्या सुविधेसाठी प्रवाशांना १३९ क्रमांकावर चौकशी करण्याचा किंवा व्हॉईस कॉलचा पर्याय निवडावा लागेल. 

व्हॉईस कॉलच्या पर्यायामध्ये प्रवाशांना त्यांचा पीएनआर क्रमांक, स्थानकाचा एसटीडी कोड आणि सुचीत दिल्याप्रमाणे स्थानकाच्या क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. 

दरम्यान, 'वेक-अप कॉल'च्या सुविधेसाठी गाडीचे नेमके ठिकाण लक्षात घेऊनच प्रवाशांना कळवले जाईल. जेणेकरून, गाडीला येण्यासाठी उशीर झाल्यास प्रवाशांना गाडीच्या स्थानकात येण्याची नेमकी वेळ कळु शकेल. 

मात्र थोडेसे पैसे मोजावे लागतील
आयआरसीटीसी आणि भारत बीपीओ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम सुरू केला असून, १३९ क्रमांकावर शहरी भागातून येणाऱ्या कॉल्ससाठी १.३९ रूपये आणि अन्य भागातील कॉल्ससाठी २ रूपयांचे शुल्क आकारले जाईल. तर लघुसंदेश सेवेसाठी प्रत्येकी ३ रूपये आकारले जाणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.