नवी दिल्ली : मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय.
देशाच्या आर्थिक स्थितीवर मान्सूनचा मोठा प्रभाव दिसून येतो. कारण भारतातील शेती मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे.
अरविंद सुब्रमणियम म्हणाले, की सध्या देशात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे महागाईत वाढ होईल, असे वाटत नाही. अवकाळी पावसामुळे देशात १ कोटी हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी मॉन्सून पावसावर अंदाज वर्तविण्यात येतात. पण, प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांमध्ये मॉन्सूनने अनेकवेळा लहरीपणा दाखविलेला आहे. यंदाच्या मॉन्सूनबाबतही असाच अंदाज वर्तविण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.