चेन्नई : चेन्नईत विजयकांत यांचा पुतळा जाळणं तेथील आदोलकांच्या चांगलंच अंगाशी आलं. विजयकांत यांचा पुतळा जाळताना आंदोलकांच्याच लुंग्या जळाल्या.
डीएमडीकेचे नेते विजयकांत यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पोस्टरविरोधात वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं. याचा निषेध म्हणून विल्लूपुरममध्ये जयललिता यांच्या कार्यकर्त्यांनी विजयकांत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र आग भडकली आणि तिथे असलेल्या आंदोलकांच्याच लुंग्या जळाल्या. यात काही आंदोलकांचे पाय होरपळलेत.