गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांची निवड करण्यात आली आहे.

Updated: Aug 5, 2016, 06:39 PM IST
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी  title=

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांची निवड करण्यात आली आहे. गुजरात भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत विजय रूपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रुपानी हे सध्या गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रूपानी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.