खबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?

तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Updated: Sep 13, 2016, 08:40 AM IST
खबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता? title=

हैदाराबाद : तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

हैदराबाद पोलिसांनी नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या वेळी ग्राहकांना कसा गंडा घातला जातो... ते स्पष्टपणे दिसतंय. 

ग्राहकांना जागरुक करून वेळीच सावध करण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी हा व्हिडिओ जाहीर केलाय.