'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं'

भारत माता की जय या घोषणेवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 2, 2016, 03:52 PM IST
'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं' title=

मुंबई: भारत माता की जय या घोषणेवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज असावा, तसंच वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावे असं मत आरएसएसचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. 

मुस्लिमांनी भारत माता की जय म्हणू नये कारण हे मूर्तीपूजा करण्यासारखं आहे, असा फतवा मुस्लिम धर्मसंस्था दारुल उलुम देवबंदनं नुकताच काढला आहे. 

तर भारत माता की जय म्हणण्याचे संस्कार तरुण पिढीला द्यावे लागतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटलं होतं. याला एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी प्रत्युत्तर दिलं होतं. गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं ओवेसी म्हणाले होते. 

यानंतर आता भय्याजी जोशींनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.