'माता वैष्णोदेवी'ला 43 किलो सोनं तर 57,000 किलो नकली चांदी भेट

श्री माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी आत्तापर्यंत अनेकदा सोनं-चांदी चढवल्याचं दिसतं... पण, यामध्ये तब्बल 43 किलो सोन आणि 57,000 किलो नकली चांदी सापडलीय. 

Updated: Sep 4, 2014, 07:58 AM IST
'माता वैष्णोदेवी'ला 43 किलो सोनं तर 57,000 किलो नकली चांदी भेट title=

जम्मू : श्री माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी आत्तापर्यंत अनेकदा सोनं-चांदी चढवल्याचं दिसतं... पण, यामध्ये तब्बल 43 किलो सोन आणि 57,000 किलो नकली चांदी सापडलीय. 

माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिल्या गेलेल्या अर्जात याचा खुलासा झालाय. कटरानजिक स्थित श्रद्धांळुंचं तीर्थस्थान म्हणून ओळखल्या गेलेल्या वैष्णोदेवी मंदिरात गेल्या पाच वर्षांदरम्यान दान केल्या गेलेल्या 193.5 किलो सोनं आणि 81,635 किलो चांदीबाबत आरटीआय अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. 

तीर्थस्थळ व्यवस्थापन बोर्डाचे मुख्य कार्यकारी एम. के. भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैंकी तब्बल 43 किलो सोनं आणि 57,815 किलो चांदी नकली असलेली आढळून आली.

भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, दानात आलेल्या किंमती धातुंचे ‘कॉईन्स’ बनविण्यासाठी सरकारकडे पाठवलं होतं. हे कॉईन्स भक्तांना प्रसादात दिले जातात. एक आठवण म्हणून त्यांच्याकडे हे कॉईन्स राहतात. 

भाविकांनी सोन्याच्या शुद्धतेची खात्री न करताच सोनं आणि चांदी खरेदी केले असू शकतात, असंही भंडारी यांनी म्हटलंय. 

श्री माता वैष्णोदेवी मंदिर देशातील सर्वात पवित्र स्थळांपैंकी एक म्हणून गणलं जातं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.