मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनला 'अच्छे दिन'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता त्याचे आता अच्छे दिन येणार आहेत. गुजरातमधील मेहसाण जिल्ह्यातील वडनगर स्टेशनचे रुप आता बदलणार आहे. या स्टेशनच्या पुर्नविकासासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे. अहमदाबादमधील सचाना गावातील इनलॅंड कंटेनर डेपोच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

vteditor vteditor | Updated: Apr 22, 2017, 11:56 AM IST
मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनला 'अच्छे दिन' title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता त्याचे आता अच्छे दिन येणार आहेत. गुजरातमधील मेहसाण जिल्ह्यातील वडनगर स्टेशनचे रुप आता बदलणार आहे. या स्टेशनच्या पुर्नविकासासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे. अहमदाबादमधील सचाना गावातील इनलॅंड कंटेनर डेपोच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

वडनगर स्टेशन हे सध्या पश्चिम रेल्वे अंतर्गत मेहसाणा तरंगा हिल मीटर गेज विभागात येते. त्यामध्ये सुधारणा करून या स्टेशनचे रुपांतर ब्रॉड गेज विभागात केले जाणार आहे असेही मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.

वडनगर हे मोदींचे जन्म स्थान आहे. या स्टेशनवर ते लहानपणी आपल्या वडिलांसोबत चहा विकण्याचे काम करत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करायचे. तसेच हा निधी पर्यटन मंत्रालयाकडून असेल. राज्य पर्यटन विभागाने वडनगर मोढेरा पाटन टुरिस्ट सर्किटसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून आठ कोटी रुपये हे वडनगर स्टेशनच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहेत असे अहमदाबादचे विभागीय रेल्वे मॅनेजर दिनेश कुमार यांनी सांगितले आहे. तसेच या वर्षभरात या स्टेशनचे काम पूर्ण होईल असेही ते म्हणाले.