केंद्रीय मंत्री लाल दिवा वापरणार नाही, मोदींचा निर्णय

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2017, 01:34 PM IST
केंद्रीय मंत्री लाल दिवा वापरणार नाही, मोदींचा निर्णय title=

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

१ मे अर्थात कामगार दिवसापासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, त्या त्या राज्यात मंत्री लाल दिवा गाडी वापरणार की नाही, याबाबतचा निर्णय राज्यांवर सोपविण्यात आलाय. लाल दिवा वापरण्याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारवर जबाबदारी सोडली आहे.

मोदींनी असा का घेतला निर्णय?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने व्हीआयपी लोक गाडीवर लाल दिवा लावून कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले होते. व्हीआयपींच्या गाडीवरील लाल दिवा, अंबर दिवा काढण्याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. सामान्यांना या लाल दिव्यांचा त्रास सहन करावा लागतो, असे मत नोंदवत ब्रिटीशकालीन कायद्याची अंमलबजावणी नको, असे सूचित केले होते. याबाबत अंतिम निर्णय न्यायालय निर्णय देणार होते. त्याआधीच मोदी सरकारने याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय.