कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Updated: Apr 1, 2015, 02:37 PM IST
कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी सीबीआय न्यायालयानं बजावलेल्या समन्सला सु्प्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. तसंच या प्रकरणी सुनावणी करण्यासही कोर्टानं मनाई केलीय. या प्रकरणी सीबीआय कोर्टानं बजावलेल्या समन्सला सिंग यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. 

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता मनमोहन सिंग यांना कोर्टात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मनमोहन सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आज सुप्रीम कोर्टानं आज हा निर्णय दिलाय. तसंच कोर्टानं सीबीआयला नोटीस जारी केलंय. 

त्यावर कोर्टानं आज ही स्थगिती दिली. आता ८ एप्रिल रोजी सु्प्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावेळी सिंग यांना हजर राहण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.