केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय गोत्यात

केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने रविवारी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. सायबराबाद पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्याने केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

Updated: Jan 19, 2016, 11:04 AM IST
केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय गोत्यात title=

हैदराबाद : केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने रविवारी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. सायबराबाद पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्याने केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

मंत्री दत्तात्रेय यांच्याखेरीज विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव पोडिले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दोन कार्यकर्त्यांवरही आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि दलितावर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या विद्यापीठातून गेल्या वर्षी निलंबित करण्यात आलेल्या ५ विद्यार्थ्यांमध्ये रोहितचा समावेश होता. 

काँग्रेसने त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणी केली. हैदराबाद येथील या घटनेचे पडसाद दिल्लीतही उमटले आणि दलित विद्यार्थी संघटनांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.