कोलकाता येथे फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने १० जणांचा मृत्यू

 कोलकातामधील गिरीश पार्क परिसरात बांधकाम सुरु असलेला नवीन फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. 

PTI | Updated: Mar 31, 2016, 03:36 PM IST
कोलकाता येथे फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने १० जणांचा मृत्यू  title=

कोलकता : उत्तर कोलकातामधील गिरीश पार्क परिसरात बांधकाम सुरु असलेला नवीन फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. या पुलाखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त आहे.

गिरीश पार्क परिसरात गणेश चित्रपटगृहाजवळ ही दुर्घटना घडली. पुलाचे बांधकाम सुरु असताना अचानक तो कोसळला. यावेळी पुलाखाली नागरिकांची वर्दळ होती. तसेच काही वाहनेही लावण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.

पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तविली आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने ढिगारा हटविण्याचे काम सुरु केले आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.