सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे

राज्यातल्या दुष्काळाच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झालीय. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असून सरकारवर संसदेत हल्लाबोल करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना खासदारांना दिलेत. 

Updated: Dec 7, 2015, 01:37 PM IST
सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे title=

नवी दिल्ली : राज्यातल्या दुष्काळाच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झालीय. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असून सरकारवर संसदेत हल्लाबोल करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना खासदारांना दिलेत. 

दुष्काळाचा निधी महाराष्ट्राला का दिला जात नाही याचा भाजपच्या मंत्र्यांना जाब विचारण्याच्या सूचनाही उद्धव यांनी दिल्यात. शिवसेनेची आक्रमकता संसदेत दिसली पाहिजे असंही उद्धव यांनी खासदारांना सांगितलंय.. महाराष्ट्राला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे असे आदेशही उद्धव यांनी खासदारांना दिलेत.

अणेंच्या राजीनाम्याची शिवसेनेची मागणी

दरम्यान, राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंनी वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरण्याची भूमिका घेतल्यावर शिवसेनेने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. आज शिवसेना आमदारांनी नागपूर विधीमंडळाच्या बाहेर अणेंच्या राजीनाम्याची आंदोलन केलं. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना पदावरून हटवा अशा आशयाच्या घोषणा सेना आमदारांनी दिल्या. तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.