वेदनादायक घटना: टीव्हीचा स्फोट झाल्यानं दोन चिमुरड्यांचा मृत्यू

दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये टीव्हीचा स्फोट झाल्यानं दोन चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. दुर्घनेच्यावेळी घरात वीज नव्हती. वीज आल्यानंतर शॉर्टसर्किटमुळं टीव्हीचा स्फोट झाला. या स्फोटात चार वर्षाचा लक्ष्य आणि दोन वर्षाच्या ईशूचा मृत्यू झाला. गाझियाबादच्या खोडा कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडलीय.

Updated: Apr 5, 2015, 01:48 PM IST
वेदनादायक घटना: टीव्हीचा स्फोट झाल्यानं दोन चिमुरड्यांचा मृत्यू title=

गाझियाबाद: दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये टीव्हीचा स्फोट झाल्यानं दोन चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. दुर्घनेच्यावेळी घरात वीज नव्हती. वीज आल्यानंतर शॉर्टसर्किटमुळं टीव्हीचा स्फोट झाला. या स्फोटात चार वर्षाचा लक्ष्य आणि दोन वर्षाच्या ईशूचा मृत्यू झाला. गाझियाबादच्या खोडा कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडलीय.

दुर्घटनेच्या वेळी घरात मुलं एकटीच होती. घराचा दरवाजा बाहेरून बंद करून मुलांचे आई-वडील बाजारात भाजी आणायला गेले होते. मुलांची आई भाजी विक्रेती आहे आणि वडील मॅकेनिक आहेत.

दोघं जेव्हा घरी परतले तेव्हा मुलं जमीनीवर मृतावस्थेत पडलेली होती. त्यांनी लगेच लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटल गाठलं, जिथं डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी पोस्टमार्टेमनंतर मुलांचं पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.