दोन बसचे खतरनाक आणि जीवघेणे रेसिंग, सोशल मीडियावर व्हायरल

 तामिळनाडूच्या कोयंबतूर येथील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 1, 2017, 07:11 PM IST
 दोन बसचे खतरनाक आणि जीवघेणे रेसिंग, सोशल मीडियावर व्हायरल  title=

कोयंबतूर :  तामिळनाडूच्या कोयंबतूर येथील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोन खासगी बसच्या ड्रायव्हरमध्ये रेसिंग लागले आहे. ही रेस रस्त्यावर धूळ उडवितांना दिसत आहे. 

कोयंबतूरच्या हायवेवरील हा व्हिडिओ असून खासगी बस चालकांच्या बेदरकार ड्रायव्हिंगचा नमुना पाहायला मिळाला आहे.

 

रेसिंगमध्ये दोन्ही ड्रायव्हरने रॉंग साईडलाही बस ही चालवली आहे. असे करत असताना बसमध्ये प्रवासीही होते. यावेळी प्रवाशांच्या प्राणाचे त्यांना सोयरसूतक नव्हते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दोन्ही ड्रायव्हरचे लायसन्स कॅन्सल करण्यात आले. 

हा व्हिडिओ दोन्ही बसचा पाठलाग करणाऱया व्यक्तीने बनला आहे. याने दोन बसचे तो व्यक्ती मोटारसायकलवरून पाठलाग करत होता.