भारतानं पाठवलेले लसणाचे ४२ ट्रक पाकिस्तानातून माघारी

भारतातून पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवण्यात आलेले लसणाचे तब्बल ४२ ट्रक पाकनं माघारी धाडलेत. 

Updated: May 5, 2016, 04:16 PM IST
भारतानं पाठवलेले लसणाचे ४२ ट्रक पाकिस्तानातून माघारी title=

चंदीगड : भारतातून पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवण्यात आलेले लसणाचे तब्बल ४२ ट्रक पाकनं माघारी धाडलेत. 

निष्कृष्ठ दर्जाचा लसूण असल्याचा आरोप

अटारी-वाघा बॉर्डरवरून हे ट्रक सिमेपलिकडे जाणार होते. परंतु, हा लसूण वापरण्यास योग्य नसल्याचं सांगत पाकिस्ताननं हे ट्रक माघारी धाडलेत. 

अमृतसरचे व्यापारी तसंच फेडरेशन ऑफ ड्राय फ्रूट अॅन्ड किराणा कमर्शिअल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हा लसूण स्वीकारण्यास नकार दिलाय. 

करोडोंचं नुकसान

उल्लेखनीय म्हणजे, भारतातून निघाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर हा लसूण परत पाठवण्यात आलाय... आणि याच क्वॉलिटीचा लसूण याअगोदरही पाठवण्यात आलाय. यामुळे, व्यापाऱ्यांना ३-४ करोड रुपयांचं नुकसान होऊ शकतं.  

भारत-पाक आयात निर्यात

भारतातून टोमॅटो, आलं, लसूण आणि सुती धागा यांसारखे खराब होणारे पदार्थ पाकिस्तानात निर्यात केले जातात. तर पाकिस्तानातून सीमेंट, जिप्सम, ड्राय फ्रूट यांसारखे पदार्थ अटारी - वाघा बॉर्डरच्या मार्गानं भारतात येतात. भारतातून पाकिस्तानात या मार्गावरून १३७ प्रकारच्या वस्तू पाठवण्यात येतात.