ज्वेलर्सना मोदी सरकारचा झटका

केंद्र सरकारनं ज्वेलर्सना जोरदार झटका दिला आहे. सोन्यावरच्या एक टक्का एक्साईज ड्यूटीचा निर्णय रद्द करायला सरकारनं नकार दिला आहे.

Updated: May 5, 2016, 03:38 PM IST
ज्वेलर्सना मोदी सरकारचा झटका title=

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं ज्वेलर्सना जोरदार झटका दिला आहे. सोन्यावरच्या एक टक्का एक्साईज ड्यूटीचा निर्णय रद्द करायला सरकारनं नकार दिला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत लोकसभेमध्ये वक्तव्य केलं आहे. 

सोन्यावर लावण्यात आलेल्या एक टक्का एक्साईज ड्यूटीमुळे ज्वेलर्स दुकानदारांनी देशभर आंदोलन केलं होतं. तसंच आपली दुकानंही बंद ठेवली होती. यावर तोडगा काढण्यासाठी ज्वेलर्सचं शिष्टमंडळ अरुण जेटलींनाही भेटलं होतं. 

ज्वेलर्सच्या मागण्यांचा विचार करु, असं आश्वासन जेटलींनी या शिष्टमंडळाला दिलं होतं. पण संसदेमध्ये मात्र सरकारचा हा निर्णय मागे घेता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.