हे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!

Updated: Feb 26, 2015, 11:01 AM IST
हे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर title=

बाडमेर, राजस्थान: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!

राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक अपघात टळलाय. एक रेल्वेगाडी तब्बल २० किलोमीटर विना इंजिन धावली. यशवंतपूर एक्सप्रेसचा एक डब्बा विना इंजिन रूळावरून धावत राहिला. यादरम्यान अनेक स्टेशन्स आले. एका स्टेशनवर विना इंजिन धावणाऱ्या रेल्वेचा एकानं मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला. 

२० किलोमीटर धावल्यानंतर हा डब्बा एका भितींला जावून धडकला. ही भिंत एअरफोर्सची होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली. तरी रेल्वेत कसा गोंधळ आहे, हे स्पष्ट झालं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.