LIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही

 भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Updated: Feb 26, 2015, 03:43 PM IST

रेल्वे बजेटची काही वैशिष्ट्ये 

- स्टेशन्सवर कॉर्पोरेट ब्रँण्डिग करून महसूल वाढवणार

- रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमणासाठी अधिकारी जबाबदार

- रेल्वे इंजीनचा आवाज कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान वापरणार

- रेल्वेच्या जमीनीवर 1 हजार मेगावॅटचे सोलर प्रकल्प उभारणार

- रेल्वेत जास्त आरामदायक सीट बनवणार

- व्हिल चिअरसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा 

- रेल्वे मार्गांवरील लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यास प्राधान्य, देशभरात १९०० हून अधिक आरओबी बांधणार, यासाठी ६ हजार कोटींचा निधी - सुरेश प्रभू

- मुंबई - दिल्लीसोबतच अन्य नऊ मार्गांवर हायस्पीड ट्रेन धावणार - सुरेश प्रभू

- रेल्वेच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) राबवणार - सुरेश प्रभू

- रेल्वेचा योजना खर्च दुपट्टीने वाढणार 

- स्टेशन्सवर कॉर्पोरेट ब्रँण्डिग करून महसूल वाढवणार 

- IIT BHU मध्ये मदन मोहन मालवीय रिसर्च सेंटर 

- ट्रेनची टक्कर होऊ नये साठी अलार्म बसविणार 

- मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अहवाल ३ महिन्यात 

- पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य - सुरेश प्रभू

- प्रवाशांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यंदा ६७ टक्के अतिरिक्त निधी देणार - सुरेश प्रभू

- रेल्वेचे अपघात कमी करण्यासाठी सुरक्षेसाठी अॅक्शन प्लान उभारणार 

- रेल्वे तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी 'कायाकल्प'ची स्थापना 

- गाडी रूळावरून घसरणार नाही यासाठी नवं तंत्रज्ञान विकसित करणार

- मानव रहीत रेल्वे क्रॉसिंगवर ऑडिओ व्हिडिओ संदेश 

- गर्भवती महिलांसाठी लोअर बर्थला प्राधान्य 

- अपघात रोखण्यासाठी जून पर्यंत अॅक्शन प्लॅन 

- स्टेशनवर सेल्फ ऑपरेटिंग लॉकर देणार 

- दिल्ली कोलकता, दिल्ली-मुंबई ट्रेनचा वेग वाढविणार 

- अप्पर बर्थला जास्त आरामदायक बनविणार 

- ६६८२ किलोमीटरचे विद्युतीकरण करणार 

- १७ हजार बायोटॉयलेट बसविणार 

- ४०० स्टेशनवर वाय-फाय सुविधा 

- मोठ्या स्थानकावर लिफ्टची सुविधा 

- दोन वर्षात देशात सेमी बुलेट ट्रेन धावणार 

- रेल्वे मेक इन इंडियाचा भाग होणार 

- पॅसेेंचर गाडी आता २४ ऐवजी २६ डब्यांची असणार 

- रेल्वेची वेळ एसएमएस द्वारे कळविणार 

- १२० दिवस अगोदर तिकीट बुक करता येणार , (चार महिने)

- मोठ्या स्टेशनवर १२० कोटी रुपयांचे एस्कलेटर बसविणार 

- ज्येष्ठ नागरिकांना खालचे बर्थ सहजतेने उपलब्ध होण्यावर भर

- गोपाळ शेट्टींचा खासदार निधी प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी वापरणार 

- मुंबईत एसी लोकल चालविणार 

- डेबिट कार्डावरून तिकीट काढण्याची विशिष्ट सुविधा

- IRCTC वेबसाइट  विविध भाषांमध्ये 

- १०८ ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सुविधा 

- महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

- स्मार्ट फोनवर जनरल तिकीट 

-  सर्व ए वन स्टेशनवर वाय फाय पुरूविणार 

 - मोबाइल चॉर्जिंग सुविधा सामान्य गाड्यांमध्येही देणार 

- ऑपरेशन पाच मिनिट तिकीट - लवकरात लवकर तिकीट देण्याचे लक्ष्य

- अनारक्षित तिकिटे पाच मिनिटात देण्याचे लक्ष्य 

- मोबाईलच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येणार, १ मार्चपासून मोबाईल अॅप 

- विमानाप्रमाणे व्हॅक्यूम टॉयलेट 

- स्टेशनवरील गाड्यांच्या सफाईसाठी वेगळा विभाग 

- १३८ क्रमांकाची हेल्पलाइनवर तात्काळ मदत

- रेल्वेमधील टॉयलेटची व्यवस्था सुधारण्यावर भर 

- स्वच्छ रेल्वे मोहीम राबविणार 

- प्रवासी भाडेवाढ होणार नाही - प्रभू 

- सरकारी, खासगी, परकीय गुंतवणुकीतून पुढे जाणार 

- ८.५ लाख कोटींच्या गुंतवणुकीची प्रभूंना अपेक्षा 

- या बजेटकडे पुढील पाच वर्षाचे बजेट म्हणून पाहिले पाहिजे - प्रभू

- रेल्वेमध्ये आर्थिक सुधारणा करणार - 

- रेल्वे पंतप्रधान मोदी यांची प्राथमिकता आहे - प्रभू

- गुंतवणूक कमी झाल्याने रेल्वेचा विकास झाला नाही 

- भावी पिढीसाठी रोजगार आवश्यक आहे - 

- प्रवाशांना आणखी चांगल्या सेवा देण्यास कटीबद्ध 

- रेल्वे बजेटमध्ये सामान्यांच्या सूचनांचाही समावेश केला 

- सुरक्षा आणि पायाभूत सुविधा पुरवणे आमचे लक्ष्य 

- एका रात्रीत रेल्वेची परिस्थिती बदलणे शक्य नाही - प्रभू

- कुछ नया जोडा होगा, कुछ पुराना तोडना होगा  - प्रभू

- रेल्वेवर अपेक्षांचे मोठे ओझे - प्रभू

- रेल्वे भारताची लाइफ लाइन - प्रभू

- सामाजिक आर्थिक विकासात रेल्वेचा मोठा वाटा 

दुपारी १२.१२ वाजता : रेल्वेचा पूनर्जन्म करणार 

दुपारी १२.११ वाजता : रेल्वेमंत्री सुरेश प्रभूचे भाषण सुरू 

सकाळी ११.३५ वाजता - रेल्वेमंत्री संसदेत दाखल

सकाळी ११.२० वाजता - रेल्वेमंत्री मुंबईतून आलेले आहेत, ते एक मध्यमवर्गीय आहेत, त्यामुळं हे बजेट सामान्यांचं असेल, शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली अपेक्षा.

सकाळी ११.१४ वाजता- व्यंकय्या नायडू यांची भाषा आम्ही सहन करणार नाही - लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, नायडूंनी दिलगिरी व्यक्त करावी, विरोधक मागणीवर ठाम

सकाळी ११.१४ मिनिट - व्यंकय्या नायडूंविरुद्ध विरोधक आक्रमक, विरोधात लोकसभेचं कामकाज ११.३० पर्यंत तहकूब

सकाळी ११.०५ मिनिट - मी कुठल्याही अपशब्दाचा वापर केला नाही, राजकारणात आरोप प्रत्यारोप चालतातच, मी संसदीय भाषाच वापरली - संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू

सकाळी ११.०४ मिनिट - विरोधकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न नव्हता, व्यंकय्या नायडूंचे लोकसभेत स्पष्टीकरण, बुधवारी लोकसभेतील नायडूंच्या भाषणावर विरोधकांनी घेतला होता आक्षेप.

सकाळी ११:०५ मिनिट - लोकसभेच्या आजच्या कामकाजाला सुरूवात

सकाळी १०:१७ मिनिट - प्रवाशांच्या समस्या, देशाची विद्यमान आर्थिक स्थिती आणि भविष्याचा विचार करुनच रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

सकाळी १०:०६ मिनिट - रेल्वे अर्थसंकल्पाची प्रत कडेकोट बंदोबस्तात संसदेत दाखल, दोन तासांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सादर करणार अर्थसंकल्प.

नवी दिल्ली : भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, या रेल्वे बजेटबाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता शिगेला आहे. एसी लोकल, तिकीट दरासह किती गाड्या वाढणार याकडेही चाकरमान्यांचं लक्ष आहे. लाईफलाईन सुखद आणि सुरक्षीत होवो ही अपेक्षा, मुंबईकर व्यक्त करीत आहेत.

मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट आज सादर होणार आहे. सबका साथ सबका विकास, अच्छे दिन या आणि अशा अनेक लोकप्रिय घोषणा देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारकडून देशवासियांच्या अपेक्षा म्हणूनच वाढलेल्या आहेत. त्यातही भारतात सर्वाधिक रोजगार देणा-या आणि दळणवळणाचे प्रमुख साधन असणा-या रेल्वेचं बजेट सादर होतेय, तेही सुरेश प्रभू या मराठी माणसाकडून. त्यामुळेच महाराष्ट्राला या रेल्वे बजेटकडून अधिक अपेक्षा आहेत.

कोकण असो, मराठवाडा किंवा विदर्भ किंवा मुंबई. प्रत्येक विभागातील रेल्वे प्रवासी गुरुवारच्या रेल्वे बजेटमधून अच्छे दिन आणि अच्छा सफरची अपेक्षा बाळगून आहेत. गेल्या काही रेल्वे अर्थसंकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या आणि खासकरून मुंबईच्या वाट्याला घोर निराशा आली होती. 

मात्र केंद्रात राम नाईक रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंबईकरांच्या अनेक समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला. त्यनतर आता तबबल १६वर्षांनंतर रेल्वेमंत्रालयाचा कारभार एका महाराष्ट्रीयन नेत्याकडे आलाय. त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्यात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.