नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राईने टेलीकॉम कंपन्यांकडे मागणी केली आहे की, त्यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना दरमहिने मोफत १०० एमबी इंटरनेट डेटा द्यावा. सरकारने नोटबंदीनंतर देशभरात कॅशलेस आणि डिजिटल इकोनॉमीला बढावा देण्यासाठी वेगवेगळे सुविधा आणि उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. TRAI ने टेलीकॉम कंपन्यांना म्हणून ही मागणी केली आहे की ग्रामीण भागात ग्राहकांना इंटरनेट सेवा मोफत द्यावी.
ग्रामीण मागात कॅशलेस व्यवहार व्हावेत यासाठी सरकार लोकांना मोबाईल
आणि इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची ही मागणी जर टेलीकॉम कंपन्या पूर्ण करतील तर यामुळे कॅशलेस इकोनॉमीला नक्कीच वाव मिळेल आणि याचा फायदा लोकांना होणार आहे.