सुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस

किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Updated: Nov 17, 2016, 10:01 PM IST
सुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस title=

भोपाळ : किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

गौरव डांगी म्हणतात की, सुषमा स्वराज या एक चांगल्या नेत्या आहेत आणि आम्हाला त्यांची गरज आहे. डांगी यांचा ब्लड ग्रुप देखील सुषमा स्वराज यांच्या ब्लड ग्रुपशी जुळतो. 

१६ नोव्हेबरला सुषमा स्वराज यांनी त्यांची किडनी फेल झाल्याचं जाहीर केलं होतं. त्या सध्या डायलासिसवर आहेत. अनेकांनी या नंतर किडनी देण्याची इच्छा बोलून दाखवली होती.