विलासरावांवर बाभळीत अंत्यसंस्कार

महाराष्ट्रालचे माजी मुख्य मंत्री विलासराव देशमुख यांचे यकृताच्या आजारामुळे निधन झाले. त्यांबच्यारवर चेन्नलई येथील ग्लोबल रुग्णा लयात उपचार सुरु होते. आज दुपारी १वाजून २४ मिनिटांनी त्यांचची प्राणज्योयत मालवली.

Updated: Aug 14, 2012, 10:55 PM IST

www.24taas.com, चेन्नई
महाराष्ट्राराचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे यकृताच्या आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी बाभळ गावात अंत्यसंस्कार होणार आहेत.
यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत.
विलासरावांवर चेन्नई येथील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी त्यांचची प्राणज्योयत मालवली. विलासरावांच्या पश्चा‍त पत्नी, ३ मुले, २ स्नुषा आणि असा परिवार आहे.
विलासरावांचे दोन्ही् मुत्रपिंड तसेच यकृत निकामी झाले होते. त्यांना ६ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ६७ वर्षीय विलासराव देशमुख केंद्रात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. बाभळगावला त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत विलासरावांचे पार्थिव अंत्यिदर्शनासाठी ठेवण्या त येणार आहे.
विलासरावांच्यार निधनानंतर लोकसभा आणि राज्येसभेचे कामकाज तहकूब करण्या त आले. राज्यवसभेत विलासरावांना श्रद्धांजली अर्पण करण्याभत आली. विलासरावांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रसक्रिया होणार होती. त्यासाठी यकृत दान करणारा एक `डोनर` उपलब्ध झाला होता. मात्र, शस्त्रक्रिया करण्याआधीच त्यांचे निधन झाले.
या व्यक्तीला गंभीर अपघात झाला होता. त्यामुळे नियमांनुसार त्यांचे यकृत विलासरावांना देता येऊ शकते. त्यामुळे शस्त्रचक्रियेची तयारी सुरु करण्या्त आली होती. परंतु, त्या‍ डोनरचा आज सकाळी मृत्यू झाला. गुजरातचे मुख्यामंत्री नरेंद्र मोदी यांनी विलासरावांसाठी गुजरातमध्ये असा दाता शोधण्यातचे आदेश दिले होते.