www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी या राजकीय सत्तासंघर्षानं अचानक `सेक्सी` वळण घेतलंय. नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी मेघना पटेल नावाच्या मॉडेलने कपडे काय उतरवले... आता, तनिषा सिंह नावाची आणखी एक मॉडेल तोकड्या कपड्यांमध्ये राहुल गांधींच्या प्रचारासाठी पुढे आलीय. राजकारणाच्या पटावर ललनांच्या या मादक `डर्टी पिक्चर`मुळं सर्वांनाच शॉक बसलाय.
प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. आता, त्यामध्ये राजकारणाचीही भर टाकावी लागेल, असं दिसतंय. कारण, राजकारणात आपल्या नेत्यासाठी वाट्टेल ते करण्याची कार्यकर्त्यांची तयारी असते. त्यात आता `हुस्न के लाखो रंग` भरायला सुरूवात झालीय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर मेघना पटेल नावाची एक मॉडेल फिदा झालीय. एवढी फिदा झालीय की, तिनं अंगावरचे कपडे उतरवले आणि भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळांच्या पाकळ्यांनी आपलं शरीर झाकून घेतलं. शिवाय `व्होट फॉर मोदी` असा फलकही तिनं हाती धरला. अशा अवस्थेतली ही `कमळाबाई` बघून सदैव दक्ष असलेल्या भाजपवाल्यांचं लक्षच विचलित झालंय. कारण, मोदींच्या प्रचारासाठी ते जंग जंग पछाडत असले तरी, प्रचाराचा स्तर एवढ्या खाली घसरेल, अशी कल्पना भाजपवाल्यांनी स्वप्नातही केली नव्हती.
महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी या प्रकाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केलीय. अशा प्रकारे बीभत्स आणि अश्लील प्रचार भाजप खपवून घेणार नाही, असं सांगतानाच, त्यांनी मेघना पटेल यांच्या कृत्याचा निषेधही केला. दोन मिनिटांच्या पब्लिसिटीसाठी असे घाणेरडे प्रकार होत असल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली.
हे थोडे झाले म्हणून की काय आता काँग्रेसच्या राहुल गांधींच्या बाजूनं आणखी एक कमी कपड्यातली मॉडेल पुढं आलीय. तनिषा सिंह नावाच्या या मॉडेलनंही मेघनाचाच कित्ता गिरवत, आपले कपडे उतरवलेत. काँग्रेसची निशाणी असलेल्या हाताच्या पंजाचे चित्र छातीभोवती लपेटून ही तनिशा राहुल गांधींचा प्रचार करू लागलीय. राहुल गांधी हे माझे आवडते नेते आहेत आणि त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला मी तयार आहे, असं ही तनिषा म्हणतेय. मेघना पटेलने केवळ फोटोसेशन करून आपली हौस भागवून घेतली. मात्र, तनिशाने आणखी पुढे जात तोकड्या कपड्यांमध्ये मीडियाला मुलाखतीही दिल्यात.
यापूर्वी पूनम पांडे नावाच्या आणखी एका मॉडेल कम अभिनेत्रीनं अशीच खळबळ उडवून दिली होती. भारताने वर्ल्ड कप जिंकला तर आपण मैदानात नग्न होऊ, असं तिनं जाहीर केलं होतं. भारताने वर्ल्ड कप जिंकला, पण पूनम पांडेला मैदानात उतरण्याची संधी काही मिळाली नाही. तेव्हा स्वतःच्या वेबसाइटवरून फोटो अपलोड करून तिने आपली वचनपूर्ती केली... पूनम पांडे असो, मेघना पटेल असो वा तनिषा सिंह... या मॉडेल्सचे अश्लील वर्तन चक्रावून टाकणारं आहे. त्यावर आता चौफेर टीकाही होऊ लागलीय. या मॉडेल्सना राजकीय पक्षांशी काहीही देणंघेणं नाही. केवळ पब्लिसिटीची भूक भागवून घेण्यासाठीच त्या अशी स्टंटबाजी करतायत, हे उघड आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी :
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.