www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
सातत्याने पेट्रोलच्या किमतीत घट होत असल्याने सर्वसामान्यांना खूशखबर मिळाली आहे. पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असल्याने पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलची कमी झालेली किंमत आज रात्रीपासून लागू होणार आहे.
गेल्या महिन्याभरातील ही चौथी घट आहे. पेट्रोलची घट सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. मुंबईत पेट्रोल ७२.८८ रूपये होते. यात आता घट होऊन ६९.७३ रुपए प्रति लीटर झाले आहे.
पेट्रोलचे शहरानुसरा जुने दर पुढील प्रमाणे आहेत. यात मुंबईत पेट्रोल ७२.८८, पुणे ७३.२१, नाशिक ७३.३०, औरंगाबाद ७४.४० असे आहेत.
दर देशातील प्रमुख शहरात तीन रूपयांची किमत कमी झालेले दर
मुंबई - ६९.७३ रुपए प्रति लीटर
चेन्नई – ६५.९० रुपए प्रति लीटर
कोलकाता – ७०.३५ रुपए प्रति लीटर
हैदराबाद ६८.८६ रुपए प्रति लीटर