नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा दौ-यावर रवाना होणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा ८ दिवसांचा आहे.
या दौ-याची सुरूवात फ्रान्सपासून होणार आहे. पीएम मोदी पॅरीसला जातील आणि त्योनमध्ये त्यांचा कार्यक्रम होणार आहे. फ्रान्सनंतर मोदी जर्मनीला जातील आणि त्यानंतर ते कॅनडाला रवाना होतील.
९ ते १२ एप्रिलपर्यंत पंतप्रधान मोदी फ्रान्स दौ-यावर असतील. तर १२ ते १४ एप्रिलपर्यंत जर्मनी आणि त्यानंतर १४ ते १६ एप्रिलपर्यंत कॅनडा दौ-यावर असतील. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी आतापर्यंत १२ देशांचा दौरा केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.