नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांचे सुवर्ण चतुर्भुज रोड नेटवर्क बनविण्याच्या फॉर्म्युलावर आता रेल्वे बुलेट ट्रेनद्वारे हिरक चतुर्भुज नेटवर्क बनविण्याची कवायत सुरू झाली आहे. या अंतर्गत रेल्वेने सध्या आणखी तीन मार्गांवर बुलेट ट्रेन शक्यता अभ्यासासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे.
इंडियन रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुलेट ट्रेन नेटवर्क तयार करण्यासाठी बनविण्यात आलेल्या रेल्वेची हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने तीन मार्गांवर अभ्यास करण्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांकडून सल्ला घेण्यासाठी अर्ज मागविले आहेत. ज्या तीन मार्गांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यात मुंबई- नवी दिल्ली, मुंबई-चेन्नई आणि नवी दिल्ली ते कलकत्ता या मार्गांचा समावेश आहे.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने १९ फेब्रुवारीपर्यंत कन्सटल्टंट सेवा देण्यासाठी प्रस्ताव मागितला आहे. लवकरच कन्सल्टंटला या मार्गावरील फिजीबिलीटी स्टडीसाठी निवडण्यात येईल.
रेल्वेच्या या योजनेत देशातील चार महानगरांना रेल्वेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. यासाठी गेल्यावर्षी हायस्पीड रेल्वे नेटवर्कसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काम सुरू
रेल्वेने मुंबई-अहमदाबाद रूटच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टवर काम सुरू आहे. तसेच नुकतेच नवी दिल्ली-चेन्नई रूटवर हायस्पीड ट्रेनसंदर्भात स्टडीचे काम चीनला सोपवले आहे. मुंबई-अहमदाबाद कॉरिडोरसाठी रेल्वेला ६० हजार कोटींची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.