वर्धमान : एक महिला २० वर्षापासून काहीही न खात पाण्यात राहते. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे ती राहते. म्हातारपणी कोणतीही महिला आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत असते, मात्र ही महिला पाण्यात राहून आपला वेळ घालवते.
ही महिला महिन्यात दोन वेळा फक्त भात खात असते. इतर वेळी ही महिला इच्छा झाली तरच जेवण करते. कमी जेवणामुळे ती शौचास खूप कमी वेळा जाते, अशी माहिती तिच्या मुलीने दिली आहे.
वर्धमानमधील कटवा या गावात राहणार्या या महिलेचे पातुरानी घोष असे नाव आहे. ती आपल्या मुलीकडे राहण्यास आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तिला भीती वाटते. त्यामुळे ती पाण्यात राहते. विशेष म्हणजे दररोज पाण्यात राहूनही या महिलेला सर्दी, खोकला असा कोणताही आजार होत नाही, असं पातुरानी यांना सांगितलं. मात्र डॉक्टर तापस सरकार यांनी पातुरानी ही एक मानसिक रूग्ण आहे. तिच्यावर उपचार केले जातील, असं म्हटलंय.