बस कालव्यात कोसळून १० ठार

तेलंगणात बस कालव्यात कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी आहेत. ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात घडली. ही बस नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली आहे.

Updated: Aug 22, 2016, 12:36 PM IST
बस कालव्यात कोसळून १० ठार title=

हैदराबाद : तेलंगणात बस कालव्यात कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण जखमी आहेत. ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात घडली. ही बस नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली आहे.

 खम्मम-हैदराबाद महामार्गावरून ही बस हैदराबादहून काकीनाडा येथे जात असताना कालव्यात कोसळली. नयाकुंगेडमजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली. 

या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जणांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.  बसमधील १८ प्रवासी जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.