आगरतळा : एका ६० वर्षाच्या वृद्ध महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आलीय. गावातील परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही मारहाण झाली, ही त्रिपुराची आहे.
काही गावकऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी जबरदस्तीने तिला घराबाहेर काढले आणि एका खांबाला बांधून मारहाण केली. एवढंच नाही तिचे मुंडन करुन तिला सोडून दिले. दक्षिण त्रिपुरातील चंद्रपूर या छोटयाशा गावात ही घटना घडली.
गावातील काही जणांनी अंजली भील या महिलेला परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन चारित्र्यहीन ठरवण्यात आले.
अंजलीने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे. यावर्षी जुलै महिन्यात दक्षिण त्रिपुरामध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. ज्यामध्ये महिलेला विवस्त्र करुन तिला आधी मारहाण करण्यात आली नंतर तिचे अर्धे मुंडन करण्यात आले होते. शेजाऱ्यांनी जखमी अंजलीला रुग्णालयात दाखल केले.