एसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!

नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय. 

Updated: Jan 4, 2017, 03:46 PM IST
एसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक! title=

मुंबई : नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय. 

यामुळे, या ई-वॉलेटस कंपन्यांसहीत ग्राहकांनाही धक्का बसलाय. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं पेटीएम, मोबी क्विक, एअरटेल यांसहीत आणखी काही ई-वॉलेटस ब्लॉक केलेत. 

हे ई-वॉलेटस ब्लॉक झाल्यानं आता ग्राहक या वॉलेटसमध्ये नेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. पण, तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर रक्कम तुम्हाला ई वॉलेटमध्ये ट्रान्सफर करता येईल. 

आरबीआयला उत्तर... 

'सीएनबीसी आवाज'नं दिलेल्या माहितीनुसार, ई वॉलेटस् ब्लॉक करण्यावर आरबीआयनं एसबीआयकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं एसबीआयनं म्हटलंय. ग्राहकांनी केलेल्या फसवणुकीच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेतल्याचं बँकेचं म्हणणं आहे. योग्य सुरक्षा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा ई वॉलेटस सुरू केले जातील असंही एसबीआयनं स्पष्ट केलंय.