सरकारने प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये : मोदी

आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात आला, सरकारने केव्हाही प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची बाजू मांडली.

Updated: Nov 16, 2016, 11:03 PM IST
सरकारने प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये : मोदी title=

नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात आला, सरकारने केव्हाही प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची बाजू मांडली.

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस काउंसिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी पत्रकारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यालाही हात घातला. पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा सरकारांची प्राथमिकता असायला हवी, असे सांगत चिंता व्यक्त केली.

आम्हाला माहिती मिळत नाही, अशी अनेक पत्रकार मित्रांची तक्रार असते. प्रसारमाध्यमांच्या कामात बाहेरील हस्तक्षेप असता कामा नये, असेही मोदी म्हणाले. प्रसारमाध्यांच्या चुकांमुळे पत्रकारितेबाबत मत तयार करणे गैर आहे. हा प्रकार म्हणजे सरकारांमधील पसंतीच्या पत्रकारांसाठी 'सिलेक्टिव्ह लिकेज' आहे आणि असे होता कामा नये, मोदी म्हणालेत.