गॅस सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द

केंद्रान कठोर निर्णय घेतल्याने स्वयंपाकाचा गॅस कसा मिळणार, या विवंचनेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा आहे, बुकिंगबाबत. सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 27, 2012, 08:42 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
केंद्रान कठोर निर्णय घेतल्याने स्वयंपाकाचा गॅस कसा मिळणार, या विवंचनेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा आहे, बुकिंगबाबत. सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द करण्यात आलाय.
ग्राहकाला वर्षभरात केवळ ६ गॅस सिलिंडर अनुदानित किमतीला देण्यावरुन देशभरात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या पेट्रोलियम मंत्रालयाने २१ दिवसांनीच सिलिंडर बुकिंग आणि पुरवठा करण्याचा नियम रद्द केल्याचा आदेश नुकताच काढला आहे.
नव्या तरतुदीनुसार स्वयंपाकाच्या सिलिंडरचा वापर स्वयंपाकाशिवाय अन्य कारणांसाठी होत नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गॅस एजन्सीजवर टाकण्यात आली आहे. ज्यांच्याजवळ एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असतील त्यांनीच ३० नोव्हेंबरपूर्वी केवायसी फार्म भरावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे फक्त एकच गॅस कनेक्शन आहे त्यांनी केवायसी फॉर्म भरण्याची गरज नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने नमूद केले आहे.
आपल्या नावावरील गॅसचे कनेक्शन कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सरकारने अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या घटविल्यानंतर ग्राहकांमध्ये असंतोष तयार झालेला असतानाच केवायसी फॉर्ममुळे आणखी गोंधळ वाढला. केवायसी फार्म म्हणजे ग्राहकांची माहिती असलेला अर्ज. दरम्यान, प्रत्येक गॅस सिलिंडर धारकांना हा फार्म भरण्याची गरज नाही असे पुरवठा खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.