शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारात सकारात्मक परिस्थिती दिसून आली. सोमवारी सकाळी मुंबई शेअर मार्केट खुले झाले त्यावेळी सेन्सेक्सने अवघ्या अर्ध्या तासात २५० अंकांने वाढ झाली. तर निफ्टीतही ५४ अंशांची वाढ दिसून आली. डिझेल दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयाचं जोरदार स्वागत शेअर बाजाराने केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 17, 2012, 12:30 PM IST

www.24taas.com,मुंबई
शेअर बाजारात सकारात्मक परिस्थिती दिसून आली. सोमवारी सकाळी मुंबई शेअर मार्केट खुले झाले त्यावेळी सेन्सेक्सने अवघ्या अर्ध्या तासात २५० अंकांने वाढ झाली. तर निफ्टीतही ५४ अंशांची वाढ दिसून आली. डिझेल दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयाचं जोरदार स्वागत शेअर बाजाराने केले आहे.
रिझर्व्ह बँकेचं मध्यतिमाही पतधोरण जाहीर होणार असल्याने मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत होते. मुंबई शेअर बाजारातील तेजी लागोपाठ नवव्या दिवशी दिसून आली.
आशियाई बाजारातील गुंततवणूकदार आणि किरकोळ दुकानदारीच्या लिलावामुळे सेंसेक्समध्ये तेजी होती. गेल्या आठ दिवसांमध्ये सेन्सेक्स १,१५३ वर पोहोचला. सुरूवातीला २१८ वर सेन्सेक्स वधारून त्यात १.१८ टक्क्यांनी वाढ झाली आणि १८,६८२.६४ या अंकावर सेन्सेक्स पोहचवला. त्यामुळे बॅंकिंग आणि इतर कंपन्यांचे शेअर मध्ये तेजी होती. जागतिक बाजारात डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचं मुल्यही वाढल्याने कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये ३.५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेचं पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर बँक, ऑटो, रिअल्टी या सेक्टर्समध्ये २-३ टक्क्यांची वाढ झाली.