काश्मीरमध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार

काश्मीरमधील मदत कार्य संपत नाही, आर्मीच्या जवानांना मदत कार्य़ातून डोकं काढायला वेळही मिळाला नाही, या आधीच जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा- माची क्षेत्रात दहशतवाद्यांशी लष्कराची चमकक झाली आहे.

Updated: Sep 17, 2014, 04:40 PM IST
काश्मीरमध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार title=

कुपवाडा : काश्मीरमधील मदत कार्य संपत नाही, आर्मीच्या जवानांना मदत कार्य़ातून डोकं काढायला वेळही मिळाला नाही, या आधीच जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा- माची क्षेत्रात दहशतवाद्यांशी लष्कराची चमकक झाली आहे.

या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत, त्यांच्या कडून २ एके ४७ तसेच काही साहित्य चकमकीच्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील हे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.

भारतीय लष्कराच्या जवानांकडून अजूनही जम्मू-काश्मीरमध्ये मदतीचं कार्य सुरूच आहे, लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम आता लष्कराने मोठ्या प्रमाणात हाती घेतलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.