पंपोरमध्ये इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

काश्मीरच्या पांपोर शहरातल्या 'जम्मू काश्मीर व्यवसायिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या' इमारतीवर आज जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 

Updated: Oct 10, 2016, 11:34 AM IST
पंपोरमध्ये इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला title=

श्रीनगर : काश्मीरच्या पांपोर शहरातल्या 'जम्मू काश्मीर व्यवसायिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या' इमारतीवर आज जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 

श्रीनगरच्या अगदी जवळ असणाऱ्या पंपोरमध्ये दहशतवादी इमारतीत लपून बसले आहेत. सकाळपासून इमारतीतून गोळीबार सुरू आहे. 

सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसरास घेराव घातलाय. दहशतवाद्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

भारताच्या सर्जिकल हल्लानंतर खो-यात दबा धरून बसलेले अनेक दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात चकमकीच्या घटना वाढल्या आहेत.