www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांना आकर्षित करून घेण्यासाठी दहा सूत्रीय अभियान राबविण्याचे ठरविले आहे. गुजरात दंगलीमुळं भाजपापासून दुरावलेल्या मुस्लिम मतदांराचं मतपरिवर्तन करण्यासाठी आणि त्यांची चाचपणी करण्यासाठी दिल्लीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.
२९ सप्टेंबरला दिल्लीत होण्याऱ्या या रॅलीत मोठया संख्येनं अल्पसंख्याक समुदाय सामील व्हावा यासाठी भाजपातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून भाजपनं, बुरखा आणि टोपी घातलेल्या मुस्लिम मतदारांची संख्या वाढवण्यासाठी अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना खालील दहा सूत्रांचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत.
१. दिल्लीतील मुस्लीमबहूल परिसरात होर्ङिग्ज, पोस्टर यांच्या माध्यमातून रॅलीबद्दल चर्चा करणे.
२. प्रत्येक जिल्हयातून कमीतकमी २००० मुस्लीम रॅलीत सहभागी होतील याची खातरजमा करणे.
३. कोणाला देखील टोपी आणि बुरखा परिधान करण्यास जबरदस्ती करू नये, मात्र दाढी ठेवणारे आणि टोपी घालणारे मुस्लिमांना सहभागी करण्यास विशेष प्रयत्न करणे.
४. महागाई आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या मुस्लिम महिलांना रॅलीत सहभागी करून घेणे.
५. ओबीसी मुस्लिमांनी सामील व्हावे याकरिता विशेष प्रयत्न करावे.
६. मदरसे, मशिदी, दर्गे याठिकाणी संपर्क साधून उपस्थिती वाढवण्यास प्रयत्न करावे.
७. ओबीसी मुस्लिम प्रमुखांशी बैठका घेऊन ओबीसी मुस्लिमांसोबत रॅलीची तयारी करावी.
८. २७ सप्टेंबरला शुक्रवारच्या नमाज पठणानंतर दिल्लीतील प्रत्येक मशिदीत रॅलीच्या तयारी संदर्भातील पत्रकं, जाहिराती वाटाव्यात.
९. रॅली संदर्भात दिल्लीतील मुस्लिमबहूल परिसरात बैठका घेऊन रॅलीची तयारी करावी.
१०. दिल्लीतील मुस्लिम मतदारांमध्ये मोदी हेच विकास पुरूष आहेत अशी प्रतिमा निर्माण करावी. ज्याप्रमाणे गुजरात मधील मुस्लिम प्रगती करत आहेत त्याच धर्तीवर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर भारतातील प्रत्येक मुस्लिम प्रगती करेल, असा विश्वास निर्माण करावा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.