जाणून घ्या: दहशतवादी कासिम खानबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर इथून जिवंत पकडला गेलेला दहशतवादी कासिम याच्याबद्दल चौकशीत अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. तो सतत आपला जबाब बदलतोय. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशननंतर एक दहशतवादी ठार झाला तर दुसऱ्याला पकडण्यात आलं.

Updated: Aug 6, 2015, 09:42 AM IST
जाणून घ्या: दहशतवादी कासिम खानबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर इथून जिवंत पकडला गेलेला दहशतवादी कासिम याच्याबद्दल चौकशीत अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. तो सतत आपला जबाब बदलतोय. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशननंतर एक दहशतवादी ठार झाला तर दुसऱ्याला पकडण्यात आलं.

जिवंत पकडल्या गेलेल्या या दहशतवाद्यानं पहिले आपलं नाव उस्मान उर्फ कासिम खान सांगितलं होतं. 

जाणून घ्या त्याच्याबद्दलचे 10 महत्त्वाचे मुद्दे-

1. 20 वर्षीय वय असलेला हा दहशतवादी पाकिस्तानच्या फैसलाबादचा रहिवासी आहे.
2. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी तो निगडित आहे.
3. तो उर्दू आणि पंजाबी बोलतो. चौकशी दरम्यान सतत आपलं नाव तो बदलत होता. 
4. कासिमसोबत चार दहशतवादी भारतात शिरले होते.
5. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी घुसपैठ केली. बारामुला सेक्टरमध्ये तार कापून दहशतवादी शिरले.
6. 12 दिवसांपूर्वी जंगलाच्या रस्त्यानं तो काश्मीरमध्ये शिरला. 
7. उधमपूरच्या चिरजी गावात त्याला पकडलं गेलं. अमरनाथ यात्रा त्यांच्या टार्गेटवर होती. 
8. एके-47 आणि काही मॅगझिन त्याच्याजवळून सापडली.
9. सीमापार करतांना त्याच्याजवळ हे हत्यार नव्हते.
10. लष्करच्या कॅम्पमध्ये दोन वेळा त्याचं ट्रेनिंग झालं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.