काश्मीरमधल्या दहा जिल्ह्यात संचारबंदीचा तेरावा दिवस

तणावग्रस्त काश्मीरमधल्या १० जिल्ह्यात आज संचारबंदीचा १३ वा दिवस आहे. सातत्यानं सुरु असलेल्या या संचारबंदीमुळे सामन्य जनजीवन पुरतं कोलमडले आहे.

Updated: Jul 21, 2016, 03:32 PM IST
काश्मीरमधल्या दहा जिल्ह्यात संचारबंदीचा तेरावा दिवस  title=

जम्मू : तणावग्रस्त काश्मीरमधल्या १० जिल्ह्यात आज संचारबंदीचा १३ वा दिवस आहे. सातत्यानं सुरु असलेल्या या संचारबंदीमुळे सामन्य जनजीवन पुरतं कोलमडले आहे.

राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. सोमवारी संध्याकाळीच या बैठकीचं निमंत्रणं पीडीपी, काँग्रेस, भाजप, आणि नॅशनल कॉन्फरन्सला पाठवण्यात आलं होते.

 पण सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी मुफ्ती सरकारला १२ दिवस लागल्याचं कारण देऊन नॅशनल कॉन्फरन्सनं या बैठकीवर बहिष्कार घातला.  दरम्यान याप्रश्नावर लोकसभेत काल जोरदार चर्चा झाली. काश्मीरमधली परिस्थिती हाताळण्यात सरकारला सपशेल अपयश आल्याचा आरोप काँग्रेसने केला.