दयाशंकर यांची जीभ हासडणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस

 उत्तर प्रदेशातील भाजप नेते दयाशंकर यांची जिभ हासडण्यासाठी बसपाच्या नेत्याने ५० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. 

Updated: Jul 21, 2016, 03:22 PM IST
 दयाशंकर यांची जीभ हासडणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस title=

लखनौ :  उत्तर प्रदेशातील भाजप नेते दयाशंकर यांची जिभ हासडण्यासाठी बसपाच्या नेत्याने ५० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. 
दयाशंकर यांनी बसपा प्रमुख मायावती यांची तुलना वारांगणेशी केली होती, अशी असभ्य भाषा बोलणाऱ्या दयाशंकर सिंह यांची जीभ कापून आणणाऱ्याला हे ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बसपाच्या चंदीगढ विभागाच्या प्रमुख जन्नत जहा यांनी दयाशंकरच्या जीभेसाठी 50 लाखाचे बक्षीस ठेवले आहे.

यावेळी उत्तर प्रदेशातील सर्व बसपाचे नेते एकत्र आले आहेत, त्यांनी लखनौत जोरदार आंदोलन करत दयाशंकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. दयाशंकर यांची भाजपने यूपी भाजप उपाध्यक्ष पदावरून हाकालपट्टी केली आहे.

दरम्यान, दयाशंकर यांच्याविरूद्ध हजरतगंज येथील बसपचे कार्यकर्ते मेवालाल गौतम यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर दयाशंकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात ज्यावेळी पोलिस दयाशंकर यांच्या केसरबाग येथील निवासस्थानी पोचले त्यावेळी ते घरी नव्हते.