ऐन सणावारात ग्राहकांना फटका, रेल्वेचं तात्काळ तिकीट महागलं

प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेनं ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के बुकिंग झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांना हा नवीन चार्ज लावला जाणार आहे.

Updated: Oct 2, 2014, 07:38 PM IST
ऐन सणावारात ग्राहकांना फटका, रेल्वेचं तात्काळ तिकीट महागलं title=

नवी दिल्ली: प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेनं ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के बुकिंग झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांना हा नवीन चार्ज लावला जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात वाढ केल्यानंतर तात्काळ तिकीटांमध्येही छुपी दरवाढ करुन प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली होती. आता यात आणखी भर घालण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तात्काळ तिकीटांमध्ये आता प्रिमियम चार्ज लागू केले जाणार आहेत. यात सुरुवातीच्या ५० टक्के तिकीटांना हा चार्ज  लागू होणार नाही. मात्र ५० टक्के बुकींग झाल्यावर उर्वरित तिकीटांना हा प्रिमियम चार्ज आकारला जाणार आहे. जशा जागा कमी होत जातील तसे उर्वरित जागेच्या दरात वाढ होत जाईल, असं या प्रिमियम रेटचं सूत्र आहे. 

प्रिमियम चार्ज सर्व गाड्यांममध्ये लागू केल्याची चर्चा असली तरी रेल्वे अधिकाऱ्यांनी सध्या प्रत्येक झोनमधील फक्त चार गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जात असल्याचे स्पष्ट केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.