www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण नॅनोसाठी तंतोतंत लागू पडते. संपूर्ण देशाची सफर करुन जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा विक्रम नॅनोने केला. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेय.
तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी ते बंगळूरपर्यंतचा १०,२१८ किलोमीटरचा प्रवास १० दिवसात पूर्ण करण्याची मोहीम नॅनोने साध्य केलीय. नॅनोने याआधीचा ८,०४६ किलोमीटर प्रवास करण्याचा विक्रम मोडील काढला. ही कार शहरातील निवासी आणि वाहनप्रेमी श्रीकरुण सुब्रम्हण्यम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवलीय. यामुळे जागतिक मोटर विश्वात भारताचे नाव नकाशात कोरले गेलेय.
फॉर्म्युला रेसिंग कारचा चॅंम्पियन नारायण कार्तिकेयननेही श्रीकरुण सुब्रम्हण्यम आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी नारायण कार्तिकेयनच्या हातून ‘ए टॉप द वर्ल्ड’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. ६३ वर्षीय थॉमस चॅको यांनी हे पुस्तक लिहीलय. कोची शहरात राहणारे हे निवासी आहेत यांनी जुलै २०१२ मध्ये नॅनोसोबत ७८ दिवसांचा देशभरातून प्रवास केला होता.
सध्या साहसी आणि मोटार चालविण्याचे क्रेझ असलेल्या ध्येयवेड्या लोकांची संख्या वाढतेय. अशी माणसे लांबचा प्रवास करण्यासाठी विमान अथवा ट्रेनने जाण्यापेक्षा कारच्या प्रवासाची मजा घेतात. श्रीकरुण सुब्रम्हण्यम आणि त्यांचे सहकाऱ्यांसारख्या माणसांना कार प्रवाससाठी प्रवृत्त करण्यासाठी असेच प्रसंग उपयोगी ठरतात, असे या नॅनोच्या विक्रमानंतर प्रतिक्रिया उमट आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.